डियर इंडिया व्हाट्स रॉनग विथ यु........?

डियर इंडिया व्हाट्स रॉनग विथ यु........? असेच एकदा मी सहज इंडिया ला विचारले....... डिअर इंडिया व्हाट्स रॉनग विथ यू? ती शांत झाली आणि मग ती अशी बोलायला लागली मला समजेनाच मी असे काय तिला विचारले... बलात्कार, अत्याचार, असहिष्णुता, कलाकारांचा बहिष्कार, गो रक्षकांचा सुळसुळाट, तथाकथित संस्कृती रक्षकांची सेने, कास्टिंग कौच, पुरस्कार सोहळा व त्यावर राष्ट्रपती पदक विजेत्यांचा बहिष्कार, आतंकवाद, दहशतवाद, ट्रॉलिंग, न्यायधीशांचा संशयास्पद मृत्यू, साक्षीदारांना धमकावणे आणि त्यांचा मृत्यू, पुतळ्यांच्या विटंबना, दलितांबरोबर सहभोजनाचा पार्सल जेवण आणून केला जाणारा थाट, वंदे मातरम ची सक्ती, भारत माता की जय घोषणेचा उदो उदो, वैज्ञानिकत्वाची पुराणकालीन घटनांशी ओढूनताणून घातली जाणारी सांगड, माध्यमे व वर्तमान पत्रांची, मुस्कटदाबी, नमामी गंगे, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तुना दत्तक देण्याची नामुष्की, जगातील सात आश्चर्यात समावेश असणाऱ्या ताजमहाल ला राज्य प्रमुख स्थळ यादीतून वगळणे, उजवीकडे बीफ बंदी तर डाव्या राज्यात बीफ प्रचार, शेतकऱ्यांची वाजतगाजत कर्जमाफी तर ती मिळवण्यासाठी तांत्रिक अडचणी, जोरजोरा...