कोरोना नंतर .....
कोरोना नंतर ..... आज कोरोनाचा विळखा केवळ भारतालाच पडलेला नसून जगातील जवळ जवळ सर्वच देशांना त्याने आपल्या विळख्यात घेतले आहे . काही देशांनी व तेथील प्रशासनाने वेळीच त्यावर उपाययोजना करण्याची खबरदारी घेतली उदा. भारत . तर काही देशांनी कोरोनाला तितकेसे गांभीर्याने नाही घेतले उदा. इटली व स्पेन व त्याच पावलावर पाउल ठेवणारा अमेरिका जेथे दिवसाला २३००० च्या आसपास नागरिक कोरोनामुळे बाधित होत असतानाही तेथील प्रशासन अद्यापही लॉक डाउनचा निर्णय घेण्यास असमर्थ ठरलेले आढळले . कोरोनाचे संकट हे किती दूरगामी परिणाम करणारे असेल हे नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेने आपल्या निवेदनामध्ये सांगितलेले आहे ; जगात दुसऱ्या महायुद्धानंतर कधी नव्हे ती अशी बिकट परिस्थिती उदभवलेली दिसून येते आहे . तिचा सामना आता केवळ कोणत्या प्रथम , द्वितीय किंवा तिसऱ्या वर्गातील राष्ट्रांनाच करावयाचा नसून सर्वानाच त्याची आर्थिक झळ ही बसणार आहे , किंबहुना ती बसण्यास सुरुवात झालेली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये . उद्या आपण सर्वच जेव्हा या कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडू तेव्हा एखादा पूर ओसरल्या...