Posts

Showing posts from March, 2025

“ती आली , ती लढली, ती जिंकली शेवटी..!” माध्यमांचे चक्रव्यूह आणि रिया चक्रवर्ती..!

“ती आली , ती लढली, ती जिंकली शेवटी..!” माध्यमांचे चक्रव्यूह आणि रिया चक्रवर्ती..!  जून २०२० मध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. त्याच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या वादळाने अनेक प्रश्न उपस्थित केले, ज्यामध्ये त्याची तत्कालीन मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर गंभीर आरोपांचा भडीमार झाला. काही माध्यमांनी तिला थेट खुनाच्या कटाचा भाग ठरवत तिच्यावर "मीडिया ट्रायल" घडवून आणली. पण चार वर्षांहून अधिक काळ लढल्यानंतर, २२ मार्च २०२५ रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला. या अहवालात सुशांतची आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले असून, रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला कोणत्याही गुन्ह्यापासून निर्दोष ठरवण्यात आले आहे. हा निकाल म्हणजे रियाच्या मूक आणि संयमी लढाईचा विजय आहे. एका तरुणीवर लादलेले आरोपांचे ओझे सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू १४ जून २०२० रोजी त्याच्या मुंबईतील बांद्रा येथील राहत्या घरी झाला. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे नोंदवले. पण सुशांतचे वडील के.के. सिंग यांन...