Tribute to Mahamanav Dr B R Ambedkar on his 59th Mahaparinirvana!

Tribute to Respected Mahamanav Dr B R Ambedkar on his 59th Mahaparinirvana....

जग बदल घालूनी घाव,
सांगून गेले मज भीमराव।

ठक.... ठक...... ठक.... ठक... काठी टेकवत,
चार व्रुद्ध एकमेकांशी... ( रात्रीच्या वेळी)...

पाहावे म्हणतो हीच का ती चैत्यभूमि चिरनिद्रा घेतोय मी जिच्यापाशी.... अथांग समुद्राचा नुसताच पसारा आणि मरणाचाही महल, गोंधळच सारा....

माझ्या बावीस प्रतिग्या  प्रवेशद्वाराशीच,
माझ्या आणि माझ्यावरच (?) लिहिलेल्या मराठी व हिंदी ग्रंथाचा अनुवादच सारा.....
दसरा, दिवाळी, पांढरी वस्त्रे आणि फुलांच्या माळा....
क्रुपया शांतता राखा, स्वच्छता राखा..
मोबाइल मध्ये फोटो काढू नये.....
रखवालदारच मारतात गप्पा आणि भरतात तंबाखूचा बार.... मावशी..!! आज मला यायला उशीरच झाला बघ... 9:40 ची लोकल सुटली राव..!... आपल्या रामदासचं चुकलंच राव दोन आकडी जागांवरून आठ जागावर शांत झाला....

पहावं म्हटलं आपलं अस्थिरुप शरीर
कुठे... (?)..... आहे.... ते.. (?)... नुसताच फुलांचा भार,
आणि पाघळलेले मेणबत्तीचे मेण
कोरड्या विहीरीसारखा तीन फुटांचा,
अर्धवट खोल समाधि गाडा...माझा.. (?)

तीन ठिकांनी भिक्कूंसाठी
गोधडीच्या रचलेल्या पलंगा
इतरांनी तेथे बसू नये, पण भिक्कूंनी
मात्र तेथेच ताणूनी द्यावी, पाय पसरून ध्यान-निद्रा (?)
😡 (रागाने).. मी काय गावंढळ भारतीयत्वाचे प्रतिक होतो (?)..आयुष्यभर सूट, बूट, टाय आणि काट्याने जेवण, सोन्याचा चष्मा, चंदेरी पेन, बूटांना चमकेची साय..

मी काय सांगण्याचा प्रयत्न केला
आणि आपण काय शिकलो?
मी देशाला "संविधान " अर्पण करून
स्वातंत्र्य, समता, बंधूभावाचा पुरस्कार केला.. तर
तुम्ही संविधान बंगलाच बांधला (?), माझेच फोटो, ब्रेसलेट, अंगठी, गंडेदोरे घालून स्वत : लाच "जय भीम " घालता (?)
अरेरे..!  पुन्हा गुलामीचेच पांघरुण ओढून घेतले...
कशासाठी इंदू मिल मध्ये माझं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक?
जी चैत्यभूमि आहे निदान ती तरी सम्रुद्ध ठेवा... भिक्कूंचा देवपणा.. राजकारणाचा पगडा जरासा हटवा...

मला विचारवंतांना, नवीन पिढीला भेटायचं आहे..
तुमच्यात माझा जीव खरंच गुदमरतोय... मी काय करू..(?)

ठक..... ठक.... ठक... ठक.... पुन्हा काठ्यांचा आवाज..
बाबासाहेब! शांत व्हा!.. गांधींचा क्षीण आवाज..
अहो, माझी अवस्था पण तुमच्या सारखीच..
विचारा हवं तर जवाहर व कायदे-आझम जीनांना..
नेहरू, जीनांसह निश्चल समुद्राच्या कठड्यांवर बसलेले...
व त्याच कठड्यांवरील सूचना - "चैत्यभूमिच्या आवारामध्ये जोडप्यांना बसण्यास सक्त मनाई आहे."

ठक... ठक... ठक... ठक... दूरवर जाणारा आवाज....
                                          ....... विक्रम अरने.

Comments

Popular posts from this blog