Posts

Showing posts from December, 2015

Tribute to Mahamanav Dr B R Ambedkar on his 59th Mahaparinirvana!

Tribute to Respected Mahamanav Dr B R Ambedkar on his 59th Mahaparinirvana.... जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भीमराव। ठक.... ठक...... ठक.... ठक... काठी टेकवत, चार व्रुद्ध एकमेकांशी... ( रात्रीच्या वेळी)... पाहावे म्हणतो हीच का ती चैत्यभूमि चिरनिद्रा घेतोय मी जिच्यापाशी.... अथांग समुद्राचा नुसताच पसारा आणि मरणाचाही महल, गोंधळच सारा.... माझ्या बावीस प्रतिग्या  प्रवेशद्वाराशीच, माझ्या आणि माझ्यावरच (?) लिहिलेल्या मराठी व हिंदी ग्रंथाचा अनुवादच सारा..... दसरा, दिवाळी, पांढरी वस्त्रे आणि फुलांच्या माळा.... क्रुपया शांतता राखा, स्वच्छता राखा.. मोबाइल मध्ये फोटो काढू नये..... रखवालदारच मारतात गप्पा आणि भरतात तंबाखूचा बार.... मावशी..!! आज मला यायला उशीरच झाला बघ... 9:40 ची लोकल सुटली राव..!... आपल्या रामदासचं चुकलंच राव दोन आकडी जागांवरून आठ जागावर शांत झाला.... पहावं म्हटलं आपलं अस्थिरुप शरीर कुठे... (?)..... आहे.... ते.. (?)... नुसताच फुलांचा भार, आणि पाघळलेले मेणबत्तीचे मेण कोरड्या विहीरीसारखा तीन फुटांचा, अर्धवट खोल समाधि गाडा...माझा.. (?) तीन ठिकांनी भिक्कूंसाठी