Posts

Showing posts from May, 2019
असंच मला खूप काही वाटतं... एका क्षणिक विसाव्याच्या क्षणासाठी जीवनात अगणित अशांत घटनांना सामोरे जावे लागते.नसते जाणीव उद्याची तरीही काळरात्रीच्या गर्भात मृत्यूचे सोंग घेऊन झोपेला जवळ करायचे असते.मग त्यात नकळत भासणाऱ्या गोष्टींना स्वप्न नावाचे अस्तर लावून कधी भयावह तर कधी आनंदित करणाऱ्या क्षणांना पाहत उठायचे असते. कशाला, कशाचीही जाणीव नसताना या नश्वर देहाच्या , व लालसेच्या इच्छा व आकांक्षांच्या पूर्ततेसाठी फक्त झगडून झगडून मरणाच्या खूप खूप जवळ जायचे असते.यशस्वी हे बिरूद नावापुढे लावले तरी मग शांत डोळे मिटण्याचे आव्हान नियतीला मिळत असते.आणि मग या जीवनचक्रात खुप थकलो की पाठीच्या आधारासाठी एक उंच झाड शोधवसं वाटतं, निवांत बसून खळाळत वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यात पाय मोकळे सोडून अविरत बसावसं वाटतं. सकाळ, संध्याकाळ , उन्ह, पाऊस, वारा यांना अनुभवायला मिळायला हवं असं वाटतं. असंच मला खूप काही वाटतं... -विक्रम अरने.