Posts

Showing posts from May, 2020

कोरोना नंतर .....

कोरोना नंतर ..... आज कोरोनाचा विळखा केवळ भारतालाच पडलेला नसून जगातील जवळ जवळ सर्वच देशांना त्याने आपल्या विळख्यात घेतले आहे . काही देशांनी व तेथील प्रशासनाने वेळीच त्यावर उपाययोजना करण्याची खबरदारी घेतली उदा. भारत . तर   काही देशांनी कोरोनाला तितकेसे गांभीर्याने नाही घेतले उदा. इटली व स्पेन व त्याच पावलावर पाउल ठेवणारा अमेरिका जेथे दिवसाला २३००० च्या आसपास नागरिक कोरोनामुळे बाधित होत असतानाही तेथील प्रशासन अद्यापही लॉक डाउनचा निर्णय घेण्यास असमर्थ ठरलेले आढळले .  कोरोनाचे संकट हे किती दूरगामी परिणाम करणारे असेल हे नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेने आपल्या निवेदनामध्ये सांगितलेले आहे ; जगात दुसऱ्या महायुद्धानंतर कधी नव्हे ती अशी बिकट परिस्थिती उदभवलेली दिसून येते आहे . तिचा सामना आता केवळ कोणत्या प्रथम , द्वितीय किंवा तिसऱ्या वर्गातील राष्ट्रांनाच करावयाचा नसून सर्वानाच त्याची आर्थिक झळ ही बसणार आहे , किंबहुना ती बसण्यास सुरुवात झालेली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये .  उद्या आपण सर्वच जेव्हा या कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडू तेव्हा एखादा पूर ओसरल्यावर जशी अवस्था

After Corona ..... (English article)

Image
After Corona ..... Today, Corona's grip is not only on India, but on almost every country in the world.  Some countries and their administrations have taken precautions to address it in a timely manner e.g.  India. So some countries did not take the corona so seriously e.g. In Italy and Spain, as well as in the United States, where around 23,000 citizens a day are affected by corona, the administration is still unable to decide on a lockdown.  The United Nations recently stated in a statement how far-reaching the Corona crisis would be;  Never before since World War II has such a dire situation been seen in the world. It is no exaggeration to say that it is not just a matter of which first, second or third nations will have to face it now, but that it will be a financial blow to all. Tomorrow, when we all come out of this corona, we will see the state of the economy in the same way as when a flood recedes, all chaotic or permanently extinct.  All sectors will now

" कोविड १९ -विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि पालकांची आर्थिक स्थिती . "

Image
" कोविड १९ -विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि पालकांची आर्थिक स्थिती . "               भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा वाढणारा आकडा पाहून मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही साथ आटोक्यात आली नाही तर लॉक डाऊन ३१ मे नंतर ही वाढविण्याची शक्यता वर्तविली . सध्या महाराष्ट्रामध्ये अंतिम पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात की घेण्यात येऊ नये असा एक वादाचा प्रसंग सुरु आहे . या विषयावर सविस्तरपणे लिहिण्याआधी या वादाची संपूर्ण पार्श्वभूमी समजावून घेणे गरजेचे आहे .  डिसेंबरपासून २०१९ पासून चीनमध्ये कोरोना विषाणूने कशाप्रकारे थैमान घातले आहे या विषयीच्या बातम्यांचे प्रसारण सर्वत्र सुरु होते. व्हाट्स एप्प व इतर सोशल माध्यमातून येणाऱ्या विविध बातम्या व व्हिडिओज वरून आपण येथे भारतात बसून त्याविषयी चर्चा करत बसायचो. त्यावेळच्या काही बोलक्या आणि प्रचलित तथाकथित प्रतिक्रिया- १. आपला भारत हा भौगोलिकदृष्ट्या उष्णकटिबंधात येत असल्याने येथील वातावरणात कोविड १९ विषाणूचा टिकाव लागणे शक्यच नाही. २. भारतातील लोकांची प्रवृत्ती आणि