Posts

Showing posts from 2019

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना...

Image
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना  स्पर्धा परीक्षा व त्यांच्या अभ्यासाची तयारी पदवीच्या सुरुवातीच्या वर्षा पासूनच क्रमाक्रमाने करणे आज खूपच गरजेचे आहे. कारण आजच्या घडीला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व त्यांच्या अभ्यासासाठी दिवस-रात्र एक करणारे यांची स्पर्धा ही परस्परांशी सुरू आहे आज स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारणे गरजेचे आहे तो म्हणजे हा अभ्यास मी खरेच माझ्या मनाला वाटत आहे म्हणून मी करत आहे का ? यातील यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेण्याची माझी शारीरिक आणि मानसिक तयारी झालेली आहे का ?आणि जर या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तरच या आव्हानांचा सामना करावयास सज्ज व्हावे आणि अशातही या परीक्षांचा काटेकोरपणे नियोजन करून अभ्यास जरी केला तरी यश मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे आपण निराश न होता प्रयत्न करतच राहावे स्वतःवर विश्वास ठेवून आपण यशस्वी होण्यासाठी आणखी कशा प्रकारे आपल्या अभ्यासाच्या नियोजनात बदल करणे आवश्यक आहे गरज पडल्यास तज्ञांची मदत घ्यावी विशेष संदर्भ पुस्तकांचा नियमित पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करावा .  स्पर्धा परीक्षांमधून काय मिळणार हा सर्वा
असंच मला खूप काही वाटतं... एका क्षणिक विसाव्याच्या क्षणासाठी जीवनात अगणित अशांत घटनांना सामोरे जावे लागते.नसते जाणीव उद्याची तरीही काळरात्रीच्या गर्भात मृत्यूचे सोंग घेऊन झोपेला जवळ करायचे असते.मग त्यात नकळत भासणाऱ्या गोष्टींना स्वप्न नावाचे अस्तर लावून कधी भयावह तर कधी आनंदित करणाऱ्या क्षणांना पाहत उठायचे असते. कशाला, कशाचीही जाणीव नसताना या नश्वर देहाच्या , व लालसेच्या इच्छा व आकांक्षांच्या पूर्ततेसाठी फक्त झगडून झगडून मरणाच्या खूप खूप जवळ जायचे असते.यशस्वी हे बिरूद नावापुढे लावले तरी मग शांत डोळे मिटण्याचे आव्हान नियतीला मिळत असते.आणि मग या जीवनचक्रात खुप थकलो की पाठीच्या आधारासाठी एक उंच झाड शोधवसं वाटतं, निवांत बसून खळाळत वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यात पाय मोकळे सोडून अविरत बसावसं वाटतं. सकाळ, संध्याकाळ , उन्ह, पाऊस, वारा यांना अनुभवायला मिळायला हवं असं वाटतं. असंच मला खूप काही वाटतं... -विक्रम अरने.

चहा की कॉफी....?

Image
चहा की कॉफी ? " चहा की कॉफी ? "असा सर्वसाधारण नेहमी विचारला जाणारा प्रश्न . काहींना चहा प्रिय तर काहींची प्रेयसी कॉफी . चहा हा कधीही व कसाही घेतला जाणारा तर कॉफी म्हणजे खास, ती धुसमुसळपणा , घाई अशा प्रकारात अजिबात घेतली जाणारी नाही . कॉफीसाठी विशेष अशी मैफल बनवावी लागते , तिची खास फर्माईश करावी लागते आणि समोर पाहत आसपासचे वातावरण व  रूप-रंग पाहत कॉफीचा गंध हा श्वासात भिनवला जातो  ; मग अलगद तिला अर्धवट ओठांना लावले जाते नकळत जिभेने त्या ओठांवरच्या अर्धवट कॉफीची चव घेतली जाते आणि मग पसंतीची मोहोर उमटली की मग हळूहळू कॉफीचे घोट घेतले जातात . चहा मात्र सहज चालता चालता तर कधी वन बाय टू , कटींग अशा तऱ्हेने घेण्याची मजा काही निराळीच किंवा औरच परंतु कॉफीला असले शेअरिंग मात्र कधी मान्य नसते ; तसेच तिला जर वन बाय टू असे जरी विभागले तर मग ती रुसून बसते ,ती लगेच थंड होते  . तिची त्यावेळेची चव म्हणजे कोमट पाण्याच्या दोन घोटांपेक्षा काही वेगळी नसते . असा तर तिचा रुसवा . चहाला कोणाचीही साथ चालते , परंतु कॉफी मात्र स्पेशल असते आणि कॉफ़ीसाठी असलेली वेळही राखीव आणि निवांत असावी लागते .